फडणवीसांनी पुरणपोळ्या खाण्याच्या स्टॅमिन्यावर केले भाष्य, म्हणाले. . . .

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमृता फडणवीस यांनी आपले पती हे ३५ पुरणपोळ्या आणि पातेलेभर तूप खात असल्याचे सांगितल्याने यावरून तुफान चर्वण घडले. यानंतर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यातील खरा आकडा सांगितला आहे.

‘झी मराठी’ या वाहिनीवर ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात नुकत्याच एका एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबात माहिती दिली. याप्रसंगी एका बैठकीत देवेंद्रजी किती किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस हे ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असं म्हटलं आहे. तर ३०-३५ पुरणपोळ्या ते कसे खातात हे पाहायची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर सोशल मीडियात धमाल उडाली होती. यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आले होते. तर याचाच आधार घेऊन तयार करण्यात आलेले मीम्स देखील खूपच गाजले होते.

या पार्श्‍वभूमिवर आता देवेंद्र फडणवीस यांनी यामागील सत्य सांगितले आहे. कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देतांना देवेंद्रजी म्हणाले की, हे बिलकुल खरे नाही. माझ्या लग्नाच्यावेळी पक्तींला बसलेलो असताना माझ्या मित्रांनी अमृता फडणवीस यांची गंमत केली की मला पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला. कधीतरी मी ३५ पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या असे मित्रांनी सांगितले. तेच अमृता फडणवीसांच्या डोक्यात होते. पण त्यांनी लग्नानंतर कधीही त्या खाल्ल्या नाही हेही सांगितले. पण हे खरं आहे की लग्नाच्या पूर्वी एकदा शर्यत लावून सात ते आठ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. आता त्याही खाऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: