खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जालना महामार्गावर बोलेरो व ट्रक मध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात 05 जण ठार , मृतकांमध्ये बोलेरो चालक , 1 महिला व 03 पुरुषांचा समावेश असून बोलेरो गाडी भक्तांना घेऊन जालना कडून शेगाव येथे गजानन महाराज दर्शनासाठी निघाली होती.अपघातात 04 जण गंभीर जखमी , जखमींवर देऊळगाव राजा व जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.