विवरे बु. उपसरपंच भाग्यश्री पाटलांनी दबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर

रावेर प्रतिनिधी । तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या विवरे बु॥ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सत्ताधारी गट प्रमुख वासुदेव नरवाडे व विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्यात वर्चस्वासाठी जिकरीची ठरली. सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे गटात१५पैकी ९ सदस्य आले तर विरोधी गटाचे पानीपत झाले.

विवरे बु॥ ग्रामपंचायतीत वासुदेव नरवाडे गटाने बाजी मारत वर्चस्व सिद्ध केले. तर विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्या गटाला सुरूंग लावल्याने भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे दोन सदस्यांनी गटप्रमुखांच्या निष्क्रीयतेला रामराम ठोकल्याने पानिपत झाले. वासुदेव नरवाडे गटात १५पैकी ९ सदस्य आल्याने वर्चस्व कायम राहिले. तर विरोधी गटाला खिंडार पाडून रामराम ठोकत विनोद मोरे हे वासुदेव नरवाडे गटात सामील झाले.

१२ फेबुवारी रोजी उपसरपंच निलीमा सणंसे यांची निवड होवून २३ एप्रिल रोजी राजीनामा दिल्याने मंजूर करण्यात आला होता. या रिक्त उपसरपंच पदासाठी ६ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांनी विरोधी गटाला सुरूंग लावल्याने भाग्यश्री विकास पाटील उपसरपंच झाल्या. परंतु विरोधकांनी गोंधळ घालून व दबाव टाकून लगेच दोन दिवसात ८ मे रोजी राजीनामा सरपंचांसमोर ठेवला. त्या राजीनाम्याच्या पडताळणीसाठी ३१ मे रोजी मासिक सभा घेण्यात आली. ही मासिक बैठक कोरम अभावी तहकुब करण्यात आल्याने २ जुन रोजी विशेष बैठक सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत ८ मे रोजी दिलेला राजीनामा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावापोटी भितीने दिला असल्याने मंजूर करण्यात येवू नये. असे उपसरपंच सौ भाग्यश्री पाटील यांनी लेखी पत्राद्वारे सांगितल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा नाकारण्यात आला. पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे विनोद मोरे हे सुद्धा विरोधकांना सोड चिठ्ठी देवून नरवाडे गटात सामील झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ देवून सदस्या श्रीमती रेखा गाढे यांनी स्वागत केले.

यावेळी सरपंच युनुस तडवी, वासुदेव नरवाडे, युसुफ तडवी, रेखा गाढे, स्नेहा पाचपांडे, नौशादबी इस्माईल खा, विनोद मोरे, ज्योती सपकाळ, इस्माईल खा इब्राहिम खा, विकास पाटिल, भागवत महाजन, गणेश सपकाळ आदींयासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content