जळगाव, प्रतिनिधी | लाभार्थी ओळखपत्र, नोंदणी पावती असून कीट घेण्यासाठी कामगार येत असतांना त्यांना कीट न देता चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील कामगारांना साहित्य कीट दिले जात असल्याचा आरोप काही कामगारांनी केला. ते सहाय्यक कामगार कार्यालयात कीट घेण्यासाठी आले असता त्यांना कीट उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर कामगारांनी ओळखीच्या व्यक्तींना कीटचे वाटप होत असून यानुसार काल रात्री १६ कामगारांना कीटचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच या कामगारांना कार्यलयीन वेळेत किट न देता रात्री कीटचे वाटप का करण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हटकर समाज कार्यालयात येथे रात्री १० वाजेपर्यंत कीटचे वाटप सुरु होते. मात्र काही कामगारांना डावलण्यात आल्याचा आरोप संतप्त कामगार करत होते. २ ते ३ महिन्यापासून लाभार्थी ओळखपत्र मिळून देखील कीट मिळत नसल्याने आज सहाय्यक कामगार कार्यलयात येऊन धडकले. मात्र, येथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे त्यांनी या कामगारांनी सांगितले. यानंतर कामगारांना हटकर समाज कार्यलयात कीट उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी हटकर समाज कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. हटकर कार्यालयात पोहचल्यावर त्यांना उपलब्ध कीट हे जामनेर व चाळीसगाव येथील कामगारांचे असल्याचे सांगण्यात आले. आम्ही नोदणी करून देखील कीट का मिळत नाही याची विचारणा तेथे करण्यात आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांने विधानसभा आचार संहिता केव्हाही लागू शकत असल्याने ही योजना बंद होऊ शकते असे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनी वेळीच लाभार्थी ओळखपत्र न दिल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. कीट वाटपाचे काम मक्तेदारास देण्यात आले आहे. सहाय्यक कामगार कार्यालयातील अधिकारी व कमर्चारी सहकार्य करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. सहाय्यक कामगार कार्यलयात अपूर्ण कर्मचारी असल्याने प्रभारी राज्य सुरु असून येथे सहाय्यक कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी हे मुख्य पदे देखील प्रभारी आहेत. तसेच २८ इन्स्पेक्टरची गरज असतांना केवळ १ इन्स्पेक्टर कार्यरत असल्याचे कॉम्रेड विजय पवार यांनी सांगितल. याप्रसंगी युसुफ रसूल खान, शांताराम कोळी, जगन राठोड, रईस कादर, सोपान तायडे, देवानंद सपकाळे, संतोष कोळी, कृष्ण कोळी, लक्ष्मण सपकाळे, हिरालाल तायडे, कबीर अन्वर पिंजारी, शे. अफजल शे. इकबाल, प्रविण सपकाळे, चंद्रभान तायडे, राहुल पाटील, शे. सिकंदर आदी उपस्थित होते.