भुसावळ, प्रतिनिधी | येथील सिंधी कॉलनी मागील हुडको कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा डेंग्यूच्या आजाराने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
हुडको कॉलनीतील रहिवासी व नाहाटा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मुस्कान प्रकाशलाल डिंगरिया(वय १८) या विद्यार्थीनीला मागच्या आठवड्यात डेंगूच्या आजाराची लागण झाली होती. यामुळे उपचारार्थ तिला प्रथम भुसावळ येथील खासगी रुग्णालयात,नंतर जळगाव व त्यानंतर मुंबई येथे हलविण्यात आले होते. मुंबई येथे उपचार सुरू असताना काल दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री तिची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसात भुसावळ शहरात डेंग्यूच्या आजाराने अनेकांचा मृत्यू झाला असून बऱ्याच रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मयत मुस्कान ही घरातील एकुलती मुलगी होती. तिच्या पश्चात आई,वडील, एक भाऊ व आजोबा असा परिवार आहे. ती झुलेलाल मंदिराचे सेवाधारी गोपीचंद डिंगरिया यांची नात होत. अत्यंत शोकाकूल वातावरणात सिंधी समाजाच्या स्मशानभुमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.