डेंग्यूने घेतला तरूणाचा बळी : मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन ढिम्म !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील नवीन गाव परिसरातील राम मंदिर गाव येथील रहिवासी असलेल्या उमेश सुभाष झांबरे (वय 32 वर्षे ) यांचे डेंगू सदृश्य आजाराने काल रात्री निधन झाले. यामुळे मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या हलगजपणाचा यावष 32 वषय तरुणाचा पहिला बळी गेल्याने याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उमेश सुभाष झांबरे (वय 32 वर्षे ) यांचे डेंगू सदृश्य आजाराने काल रात्री निधन झाल्याने स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबके तयार झालेले आहे. तसेच गटारींना उतार नसल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. यामुळे ठिकठिकाणी डासांची निर्मिती झालेली असल्याने तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या संदर्भात मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घडेकर यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात वेळोवेळी आरोग्य विभागामार्फत संबंधित ग्रामपंचायत व नगरपंचायत यांना सूचना देण्यात आलेले असल्याचे सांगितले. त्यासोबतच आज मुक्ताईनगर येथील नगरपंचायत ला गावात धुरळणी तसेच फवारणी करणे संदर्भात पत्र देण्यात आले असून तसेच शहरातील व तालुक्यातील खाजगी दवाखाने तसेच पॅथॉलॉजी चालकांना पत्राद्वारे कळविण्यात आले असून त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांच्या संदर्भात माहिती तात्काळ आरोग्य विभागाकडे कळविण्याचे सुचित करण्यात आले असल्याचे डॉक्टर घाडेकर यांनी सांगितले आहे.
परंतु मुक्ताईनगर येथील नगरपंचायत विभागातर्फे आजपर्यंत धुरळणी अथवा फवारणी करण्यात आली नसतानाही मुक्ताईनगर शहरात नगरपंचायत तर्फे धुरळणी तसेच फवारणी करण्यात आल्याची चुकीची माहिती व दिशाभूल करणारी माहित आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर तसेच मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी डेंगूसदृश्य आजाराने आजपर्यंत बळी ठरलेल्या रुग्णांच्या घटनां मुळे संबंधितांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही नागरिकांमधून केली जात आहे.

Protected Content