जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फार्मा कंपन्यांच्या प्रयत्नांच्या निषेधार्थ ‘ॲन्टी व्हिक्टिमायझेशन डे‘ निमित्त महाराष्ट्र सेल्स ॲण्ड मेडीकल रिप्रेझेंन्टेटीव्ह शाखेच्या वतीने आज सकाळी आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता याबाबत सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, “भारतात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या व्यवसायाच्या पुनर्रचनेच्या नावाखाली विक्री प्रमोशन कर्मचार्यांची सतत छाटणी करत आहेत. यामध्ये देशी विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे विक्री प्रमोशनच्या नियमित कामांऐवजी फ्रँचायझी कामगारांकडून मार्केटिंग करण्याचे उद्दिष्ट आहे. विलीनीकरणाच्या इतर अनेक घटना फार्मास्युटिकल उद्योगातही घडत आहेत, जेथे विद्यमान सेवा अटींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले जात आहे. उद्योगक्षेत्रात ‘हायर एन फेअर’ हे धोरण राबवले जात आहे.
त्यामुळे मेडीकल प्रतिनिधी यांचा संघटीत मोडला जावून त्याच्या अन्याय केला जात असून या विरोधात आंदोलने आणि संघटित होण्याच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित आहे.” त्यामुळे आज मंगळवारी १९ जुलै रोजी आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक कामागार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी संदीप पाटील, अझर शेख, सागर घटक, चेतन पाटील, मनीष चौधरी, राजेश पोद्दार, दिनेश जगताप, महेश चौधरी, विशाल चौधरी, वैभव शिरोळे यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.