जिल्हास्तरीय महिला व तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ रोजी तर तालुकास्तरीय लोकशाही दिन २४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरीता प्रभावी उपाययोजना म्हणून महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने माहे फेब्रुवारी महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १७ फेब्रुवारी तर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २४ फेब्रुवारी, २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ होईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content