जळगावात संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त शोभयात्रा (व्हिडीओ)

WhatsApp Image 2020 02 09 at 6.58.44 PM

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुख्य मार्गावरून संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करीत संत रोहिदास महाराजांचा जयघोष केला.

जगद्गुरू संत रोहिदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला रेल्वे स्थानकावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार पदाधिकाऱ्यांनी अर्पण केला. त्यांनतर संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शोभयात्रेला प्रारंभ झाला. दोन वाहनांवर संत रोहिदास महाराजांच्या भव्य प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी समाजबांधवांनी संत रोहिदास महाराजांचा जयघोष केला. प्रसंगी ढोलताशांच्या गजरात व संत रोहिदास यांच्या भक्तीगीतांवर समाजबांधवांनी ठेका धरला. लहान मुलांसह महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या. शोभायात्रा रेल्वे स्थानक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे संत गाडगेबाबा उद्यानात जाऊन समारोप झाला.

यांनी घेतला सहभाग
शोभयात्रेला संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे, उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, सहसचिव संजय खजुरे, खजिनदार विजय अहिरे, परमेश्वर अहिरे, रवींद्र धोरे, महेंद्र मेथे, लखन झीरे, साहेबराव खजुरे, कैलास मेथे, लताबाई धोरे, कल्पना धोरे, मंगलाबाई मेथे, सुमनबाई अहिरे, सुमनबाई खजुरे, सुनील वाघ, रतन खजुरे, प्रवीण बेहेरे, राजू धोरे, पंडित धोरे, दिलीप जिरे, प्रकाश खजुरे, नरेंद्र अहिरे, दीपक जाधव, गणेश धोरे, विक्रम हिरे, काशीनाथ खजुरे आदींनी सहभागी होत परिश्रम घेतले.

Protected Content