धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते सिल्वासा व जळगाव ते नवसारी या बसेस धरणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी धरणगाव येथील खान्देश प्रवासी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या जळगाव येथून एरंडोल डेपोच्या दोन बस (१. जळगाव – एरंडोल – धुळे – साक्री – नवसारी आणि २. जळगाव – एरंडोल – धुळे – नाशिक – त्र्यंबकेश्वर – सिल्वासा) नियमित धावतात. तसेच जळगाव डेपोच्याही काही बसेस याच मार्गावरून ठराविक वेळेच्या अंतराने धावतात.
खान्देश प्रवासी असोसिएशनने मागणी केली आहे की, जर या बसेस १. जळगाव – धरणगाव – अमळनेर – धुळे – साक्री – नवसारी आणि २. जळगाव – धरणगाव – अमळनेर – धुळे – नाशिक – त्र्यंबकेश्वर – सिल्वासा या मार्गे सुरू केल्यास धरणगाव तालुक्यातील प्रवाशांना याचा लाभ होईल. तसेच एसटी महामंडळास टोलच्या रकमेची बचत होईल. धरणगाव तालुक्यातील प्रवाशांना धरणगाव येथून थेट नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिल्वासा व धुळे, साक्री, नवसारी येथे जाण्यासाठी दररोज सोय होईल या बसेस जळगाव येथून सकाळी ८:३० व ९:३० वाजता धावतात. यासोबतच उन्हाळा सुरू होत असल्याने धरणगाव बसस्थानकावर वॉटर फिल्टर व कूलर बसवण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयास जैन, सहसचिव ॲड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, सदस्य नारायण महाजन, प्रशांत भाटिया, दिनेश पाटील, कन्हैया रायपुरकर, संभाजी सोनवणे व जतिन नगारिया उपस्थित होते.