यावल नगरपालिका व पंचायत समितीत दिव्यांगांना सुविधा देण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिका आणि पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांना विविध सुविधा देण्यात याव्यात या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने यावल येथील पंचायत समिती व नगर परिषद येथे विविध मागण्यांन साठी निवेदन देण्यात आले. त्यात पंचायत समिती व नगरपालिके मध्ये रँप बसवणे, नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये ५० टक्के घरपट्टीमध्ये सवलत देण्यात यावी. दिव्यांगांसाठी दिव्यांग हॉल व गार्डन ची निर्मिती करण्यात यावी अशा आशयाच्या या मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, सदर निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रवीण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष जनार्दन फेगडे, मिथुन सावखेडकर, दिलीप चौधरी,दिलीप आमोदकर, उत्तम कानडे, प्रदीप माळी,शशिकांत वारुडकर, महिला आघाडीचे अध्यक्ष खुशबू चौधरी,उपाध्यक्ष सरला तायडे,मंगला बारी,गीतांजली वरुडकर तसेच दिव्यांग बांधव असीम शेख , शब्बीर खान रफिक, भगवान माळी, किरण सुरवाडे ,दिनकर चौधरी, नलनी चौधरी, सिकंदर पटेल,शेख अस्लम शेख हमीद ,चंद्रकांत बावस्कर शाहरुख पटेल ,शेख इस्माईल,शेख वजीर,फिरोज पटेल असे मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

Protected Content