ग्रामीण रूग्णालयात चाकू घेवून धमकावणाऱ्यांवर गुन्हे दाखलची मागणी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हातात चाकू घेवून दहशत निर्माण करत जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या अनोळखी तीन ते चार जणांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

जळगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान अनोळखी ३-४ जण हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी दारूच्या नशेत येवून आला. दरम्यान या ग्रामीण रुग्णालयात कक्षसेवक विजय बाबूलाल पाटील आणि अधिपरिचारक विशाल सुरेश केदार हे ऑन ड्युटी असताना अनोळखी तीन ते चार जणांनी सर्व रूग्णालयातच्या कक्षामध्ये येवून मोठमोठ्याने आरडा ओरड केली. तसेच हातात चाकून घेवून विजय पाटील यांना धमकावत शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कक्षसेवक विजय पाटील आणि आधीपरिचारक विशाल केदार या दोघांनी धरणगाव पोलीस ठाण्यात कारवाई करण्यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान अत्या परत या संदर्भात पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content