चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील निमगव्हाण येथे गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आज नायब तहसीलदार राजेश पौळ यांसह तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनावर गावातील १५० शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. तसेच गावातील ग्रामस्थ दिलीप पाटील, धनेश भाटिया, लोटन पाटील, अनिल बाविस्कर, राजेंद्र पाटील, देवानंद पाटील, मंगला पाटील, टेमलाल पाटील, शशिकांत बिऱ्हाडे, वकील बाविस्कर, ढेकू पाटील यांच्यासह आदींच्या उपस्थितीत तहसीलदार राजेश पौळ आणि तालुका कृषी अधिकारी यांनी निवेदन देण्यात आले.