जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाडी येथील दलीज वस्ती पाणीपुरवठ्याची कुठलीही सुविधा नसल्याने पाणीपुरवठ्याची योजना राबवावी, अशी मागणी येथील रहिवाश्यांसह भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जामनेर तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले.या निवेदनावर ज्येष्ठ सामाजिक विचारवंत किशोर तायडे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, प्रवक्ता वैभव सुरवाडे, ग्रामपंचायत सदस्य भरत जंजाळे, अनिल बोदडे, रवी बोदडे, धर्मा बोदडे, किरण जंजाळे, प्रकाश निकम, पांडुरंग तायडे, विकास काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाण्याची समस्या सोडवा अन्यथा आंदोलनाचा इशारा
निवेदन म्हटल्याप्रमाणे जामनेर तालुक्यातील वाडी या गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने वाडिया गावातील दलीत वस्तीतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे येथील महिलांना पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते गावातील दलीत नागरीकांना पाण्याची समस्या लवकरात लवकर सुटका व्हावी व त्यांना लोखंडी पाईप लाईन टाकून द्यावी जेणेकरून कोणीही इतरत्र अवैध कनेक्शन घेऊ शकणार नाही हे वस्ती पाणीटंचाईपासून मुक्त होईल, असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने देण्यात आला.