Home धर्म-समाज मसाका कामगारांच्या आढावा बैठकीत कारखाना पूर्ववत चालू होण्याची मागणी

मसाका कामगारांच्या आढावा बैठकीत कारखाना पूर्ववत चालू होण्याची मागणी

0
24

फैजपूर, ता.यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपूर कामगारांची दिनांक ११ मार्च रोजी कारखान्यात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत कारखाना पूर्ववत चालू होणे, जिल्हा बँक कडून कारखान्यास सिक्युरिटीझेशन नोटीस बजावली आहे. यामुळे बँक किंवा संचालक मंडळ कारखाना हा जरी भाडे तत्वावर दिला तरी येणाऱ्या उत्त्पन्न मधून कामकाज पटलावर असणाऱ्या कामगारांना कामावर पूर्ववत घेणे तसेच आधीच्या थकीत पगार ,पी एफ, व सेवानिवृत्तीच्या रक्कमा मिळण्यास प्राधान्य मिळणे आदी विषयावर उपस्थितान मध्ये एकमुखी विचार विनिमय करण्यात आला.

या बैठकीत चेअरमन शरददादा महाजन, ऍड उदय चौधरी यांनी कामगार पदाधिकारी यांच्या व्यथा जाणून घेत संवाद साधला यावेळी कारखाना चे आजी माजी कामगार अध्यक्ष, सेक्रेटरी, युनियन पदाधिकारी, सदस्य, सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते.


Protected Content

Play sound