जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत शिवसेनेची ठरेल भूमिका निर्णायक

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येणाऱ्या काळातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत संघटना बांधणी असो किंवा विकास कामांचे श्रेय यात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चिन्ह आहे.

येणाऱ्या काळातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनाही १५ वर्षानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील यांच्या रूपात पुन्हा कमबॅक करणार असल्याचे वातावरण आहे. येणाऱ्या पंचायत समितीसह जिल्हा परिषदच्या निवडणूकीत संघटना बांधणी असो किंवा विकास कामांचे श्रेय यात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे .

यावल तालुक्यातील जोडले गेलेल्या पूर्व क्षेत्रातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील मतदार संघातील विविध गावांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा शिवसेना रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख प्रा.चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे प्रगतीपथावर असून महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्यात शासन आल्यापासून शिवसेना पक्षाची तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रावर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांमध्ये व युवकांमध्ये मोठीपकड निर्माण झाली आहे.असून आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत याचा फायदा पक्षाला मिळणार असल्याचा राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

पक्षाच्या बांधणीसाठी तालुक्यातील तळागळातील नागरीकांशी व पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याशी दांडगा संपर्क असणारे आणि नेहमीच सर्वसामान्यांच्या संपर्कात राहणारे व पालकमंत्र्यांचे खंदे सर्मथक व आमदार सौ .लताताई सोनवणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेने जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील यांच्या रूपात यावल पंचायत समितीमध्ये शिवसेनेला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे भाकित व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर शिवसेनाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Protected Content