कुणाल कामरा विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी; धरणगाव पोलिसांना निवेदन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी त्यांच्या एका कॉमेडी कार्यक्रमात शिवसेना प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाल कामरा याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन यांनी मंगळवारी २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कुणाल कामरा यांनी आपल्या कॉमेडी शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विखारी मजकूर असलेले गाणे सादर केले. त्यानंतर हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असून, समाजात राजकीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले आहे. त्यामुळे तातडीने कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, याला संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Protected Content