सावदा प्रतिनिधी । येथील परिसरातील श्रद्धास्थान असलेले कुलस्वामिनी निमजाय मातेचे मंदिर आहे. मात्र, मंदिरात ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्ता मातीचा असल्याने हा रस्ता मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निधीतून किंवा इतर निधीतून हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून द्यावा, अशी मागणी सावदा शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या गावाच्या जवळच एक किलोमीटर शेत शिवारात हे मंदिराचे स्थान आहे. परिसरातील भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले हे आई निमजाय मातेचे मंदिराजवळ दर्शनासाठी भाविकांना येण्या-जाण्यासाठी मातीचा रस्ता असून तोरस्ता खचलेला असल्याने हा रस्ता आमदार निधीतून करून द्यावा अशी मागणी सावदा शिवसेनेच्यावतीने मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
शहरासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले निमजाय माता मंदिर असून तेथे भाविक दर्शनासाठी ये-जा करीत असतात नवरात्र उत्सव मध्ये तेथे मोठा उत्सवही भरत असतो तसेच लग्न समारंभ इतर कार्यही त्या ठिकाणी होत असतात शहरातून त्या ठिकाणी जाणे रस्ता हा मातीचा व तो पण खचलेला असल्याने व मातीचा असल्याने हा रस्ता मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निधीतून किंवा इतर निधीतून हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून द्यावा अशी मागणी सावदा शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.