Home Cities भुसावळ भुसावळ येथे वार्ड क्रमांक ११ मध्ये साफसफाईची मागणी

भुसावळ येथे वार्ड क्रमांक ११ मध्ये साफसफाईची मागणी


bhusaval gatari

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील नगर पालिका वार्ड क्रमांक ११ मधील बाजार रोड, इमली पुरा व जाम मोहल्ला भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथे नगर पालिकेने त्वरित साफसफाई करावी, अशी मागणी तेथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

यानिवेदनात म्हटले आहे की, या भागात कचऱ्याचे ढिग साचले आहेत, गटारी तुंबल्या आहेत, डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपात लिकेजमुळे हे घन पाणी जात असल्याने पाण्याला घाण वास येतो. त्यामुळे येथे लवकरात लवकर सफाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने इंडियन युनियन मुस्लीम लीगचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सैय्यद सादिक अली यांनी केली आहे.


Protected Content

Play sound