बहुळा नदीच्या पूलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी

पाचोरा प्रतिनिधी । पिंपळगांव (हरेश्वर) ता. पाचोरा येथील बहुळा नदीवरील पूल अपघाताला आमंत्रण देत असून  “सार्वजनिक बांधकाम” विभागाने याकडे लक्ष देऊन वाहून गेलेला भराव, तात्काळ भरण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पिंपळगांव (हरेश्वर) ता. पाचोरा येथील बहुळा नदीवरील वळणावरच भराव वाहून गेल्याने वाहतूकदारांचा जीव मुठीत ठेवत पार करावा लागत आहे. बस स्थानकाकडे जाणारा एकमेव रस्ता भागातील २२ ते २३ गावांशी संपर्क करण्यासाठी जोडला जाणारा पिंपळगाव – पाचोरा हा एक रस्ता आहे.  पिंपळगाव – वरखेडी – पाचोरा रस्त्यावर २२ किलो मीटर अंतरावर पिंपळगाव ग्रामीण रुग्णालय येथे बस स्थानकादरम्यान एकदम यू-टर्न वळणावरच नव्यानेच बांधलेल्या पुलाचा अति पावसाच्या पाण्यात भरावच वाहून गेल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यात वळण असल्यामुळे मोठे वाहनांना अपघात होण्याची भीती चालक वर्तवित आहेत. “सार्वजनिक बांधकाम” विभागाने याकडे लक्ष देऊन वाहून गेलेला भराव तात्काळ भरण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मोठी वाहने अर्थात बसचालकांनाही मोठी कसरत करून आणि जीव मुठीत घेऊन या पुलावरील वळणावर बस चालवावी लागत आहे.

 

Protected Content