भुसावळ प्रतिनिधी । येथील भोईनगरातील नागरिकांनी आज दि.29 जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करुन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देत तहसील अधिका-यांना तक्रार निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, भोईनगर येथील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानदार संनासे गेल्या ३ महिन्यापासून रेशन कार्डवर धान्य देत नाही. महिलांना वेळोवेळी फे-या माराव्या लागतात. तसेच दुकानावर आलेल्या महिला वर्गाशी उध्दट भाषेच्या व दमदाटी करून महिलांचा अपमान केला जातो. तुमचे रेशन कार्ड जाळून टाका, अशा नेहमी च दम भरण्यात येत असतो. येथील हे कुटुंब गोरगरीब व मंजुरी करून पोट भरत असतात. मात्र बाजारातील महाग धान्य विकत घेणे परवडणारे नसून ते घ्यावे लागते. म्हणून शासनाने तात्काळ अर्जाची दखल घेवुन वेळेवर धान्य मिळावे व स्वस्त धान्य दुकानदारावर संनासे यांच्यावर कारवाई करून दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा नंदा सपकाळे यांनी दिला आहे.