पहूर येथे अतिक्रमण काढण्यात भेदभाव करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कामात भेदभाव करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.      

जळगाव औरंगाबाद महामार्गाचे काम सुरू असल्याने आजूबाजूचे अतिक्रमण काढले जात आहे .अतिक्रमण धारकांचे सहकार्य मिळत असून लोक स्वखुशीने आपले अतिक्रमण काढत आहे . रोडच्या सेंटर पासून 14 मीटर 7 इंच अतिक्रमण काढण्यात येत  आहे . मात्र एकाच ठिकाणी 15 मिटर अतिक्रमण का काढण्यात येत आहे ?संबंधित अधिकारी हातावर पोट भरणाऱ्यां त्रास तर देत नाही ना ? इतर ठिकाणी 14 मीटर सात इंच अतिक्रमण काढले तर एकाच ठिकाणी या संबंधित अधिकार्‍याने 15 मीटर अतिक्रमण काढण्याचा आग्रह कोणाशी हातमिळवणी करून तर धरला नाही ना ?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात असून  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व टेपने मोजणी करणारा जबाबदार राहील असे बोलले जात आहे  .याप्रकरणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य  नागरिकांन मधून  केली जात आहे .

टेपने  मोजणी योग्य करा –

पहूर येथे रस्त्याच्या सेंटर पासून 14 मीटर 7 इंच अतिक्रमण काढण्यात येत आहे .मात्र शिवभक्त रंगनाथ महाराज व रतन  जाधव यांच्या दुकानासमोर पंधरा मीटर अंतरावर मार्किंग करून अतिक्रमण काढण्याचा आग्रह संबंधित अधिकाऱ्याने का धरला ?असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे . टेपने मोजणी करणारा याच ठिकाणी रोडच्या सेंटर पासून मोजणी न करता रोडचे  सेंटर सोडून १ मीटर पुढे मोजणी करीत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे . टेपने मोजणी करणाऱ्याने कोणाशी हात मिळवणी तर केली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून  याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे .

शासन एकीकडे दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवत आहे .दिव्यांगांना स्वयंरोजगाराची साधने पुरवीत आहे. स्वयंरोजगारातून दिव्यांगांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत .मात्र पहूर येथे चहाची विक्री करून पोट भरणार्‍या मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या निळकंठ रंगनाथ सोनार या तरुणाची रोजीरोटीच हिसकावण्याचा हिन दर्जाचा प्रयत्न का  केला जात आहे ?असा सवाल व्यक्त होत आहे . रस्त्याच्या मध्यापासून योग्य अंतरावर मार्किंग करून अतिक्रमण दूर करण्याची त्यांची तयारी असतानाही त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे  . रुद्र अपंग  संघटनेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात येत असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे .  अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे . प्रशासनाने या प्रकरणी त्वरित दखल घेऊन संबंधितच न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे .

 

 

Protected Content