नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांसाठी महत्तपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार आता दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार असून 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. तर, उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असे केजरीवाल यांनी सांगितले. या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डेटा दरमहा वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.