दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीसाठी अंतरिम जामीनावर बाहेर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा जामीन ७ दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने आज नाकारली आहे. वैद्यकीय कारणांसाठी ही याचिका करण्यात आली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आता २ जून रोजी तिहार तुरुंगात पुन्हा रवानगी होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या अंतरिम जामीनाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे आहे, असे २८ मे रोजी सुट्टीकालीन खंडपीठाने म्हटले होते. परंतु, त्यांच्या जामीन याचिकेवर तत्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, रजिस्ट्रीने तत्काळ सुनावणीला नकार दिला.