बनावट खाते बनवून तरूणीची बदनामी; सायबर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तरूणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून चॅटींगद्वारे बदनामी केल्याचा प्रकार गुरूवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, फिर्यादी  २१ वर्षीय तरूणी शहरातील एका भागात आपल्या कुटुंबियांसह राहते. yeshi chat dot com यावेबसाईटवर एका अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या नावाने बनावट खाते व प्रोफाईल तयार केले. बनावट खाते खरे भासवून अज्ञात व्यक्तीने अनोळखी लोकांशी चॅटींग करून तरूणीचे खात खरे भासविले. दरम्यान तरूणीचा मोबाईल क्रमांक देवून यावर अनोळखी व्यक्तीचे फोन व मॅसेज करण्यास सांगून तरूणीची बदनामी केली. हा प्रकार असहाय्य झाल्याने तरूणीने सायबर पोलीस ठाण्यात गुरूवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे. 

Protected Content