Home Cities जळगाव काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर

काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर



जळगाव (प्रतिनिधी) शहर जिल्हाअध्यक्ष डाँ.राधेश्याम चौधरी यांच्या शिफारसीने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर यांची नियुक्ती केली आहे.

दिपक बाविस्कर यांनी सामाजिक राजकीय विविध पदे भूषविले आहे. ते महाराष्ट्र परीट धोबी महासंघ या संघटनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आहेत. तसेच संत श्री गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था जळगाव या सामाजिक संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख असून मागील पंधरा वर्षां पासून पत्रकारिता करत आहेत. जळगाव शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढविली आहे. दुसरीकडे चेतन कासलीवाल (MBA finance) यांची जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या सोशल मिडीया सेलच्या समन्वयकपदी तर रियाज शेख (B. E.) यांची सहसमन्वयकपदी नियूक्ति कॉंग्रेस सोशल मिडीया सेलचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत सपकाळ यांच्या आदेशाने झाली आहे. यानिमित्ताने कॉंग्रेसने तिन्ही उच्चशिक्षित तरूण चेहर्यांना संधी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound