Home Cities जळगाव परशूराम विठोबा पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात साजरी

परशूराम विठोबा पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात साजरी


जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरूवर्य परशूराम विठोबा पाटील विद्यालयात आज रविवार ८ ऑगस्ट रोजी दिप अमवस्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिकांनी सहभाग नोंदवून ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

सविस्तर माहिती अशी की, केसीई संचलित परशूराम विठोबा पाटील विद्यालयात आज रविवार ८ ऑगस्ट रोजी दीप आमवस्येच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून दीप अमावस्याचे महत्व शिक्षकांनी पटवून दिले. तर विद्यार्थ्यांनीही त्यांच्या घरी राहून दिव्यांची आरास तयार केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्या सर्व गोष्टींचे उतराई होणार गरजेचे असते आणि तीच आपली भारतीय संस्कृती आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणारे दिवे कंदील आणि इतर सर्व प्रकाशित करणाऱ्या वस्तू आपण श्रावण मासाच्या अगोदर स्वच्छ धुऊन ज्योत लावून त्यांची पूजा करतो आणि देवाकडे प्रकाशमय जीवनाची मागणी करतो असे सांगितले.  


Protected Content

Play sound