कोविशिल्ड-कोव्हॅक्सिनच्या संमिश्र डोसचे चांगले परिणाम

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याची माहिती दिली आहे.

 

या दोन्ही लसींचे  समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही निष्पन्न झालं आहे. मिश्र लसीच्या शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसल्यास लसीकरण मोहीमेला वेग मिळणार आहे.

 

वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

 

 

कोविशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (B117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (B1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.

कोव्हॅक्सिन– ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं २ ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

 

Protected Content