स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला.

साधारणपणे 1100 चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हा उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनला असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका सौ.ज्योती चव्हाण व प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी हे उद्यान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व परिश्रम घेतले.

माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील व महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार  राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, श्री.नितीन लढ्ढा, सौ.सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका सौ.सुरेखा तायडे, सौ.अंजनाबाई सोनवणे, सौ.गायत्री राणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, नगरसेवक .जितेंद्र मराठे, नितीन बरडे,  गणेश सोनवणे, विरेंद्र खडके, महापालिका शहर अभियंता अरविंद भोसले, शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे आदींसह रायसोनीनगरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्यानाचे मक्तेदार श्री गजानन एन्टरप्राइजेस, जळगाव हे आहेत.

 

Protected Content