मुंबई : राज्य सरकारने आज घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. राज्य मंत्रीमंडळात मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि.1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3% ने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2% ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोविड19 च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. परिणामी राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे तिला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आज बरेज महत्वाचे निर्णय घेतलेत. याच पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.