पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात पत्ते खेळण्यातून झालेले कर्ज फेडण्यासाठी आजीकडे वारंवार पैशाची मागणी करूनही आजीने पैसे ने दिल्यामुळे नातूने हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्याती हरेश्वर येथे घडली असून मंजाबाई दगडू भोई असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, मंजाबाई यांच्या बहिणीचा नातू विशाल प्रभाकर भोई याच्यावर पत्ते खेळण्यातून कर्ज झाले होते. ते कर्ज परतफेड करण्यासाठी त्यांनी आजी मंजाबाईकडे पैशाची मागणी केली होती. सतत पैसे मागूनही आजी पैसे देत नसल्यामुळे त्यांने आजीचा गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तिच्या हातातील चांदीच्या गोट, पाटल्या पैकी एक गोट पाटली व कानातील सोन्याच्या बाळ्या अंदाजे एकलाख किमतीचे काढून घेतले. याप्रकरणी विशाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतले.