जळगाव (प्रतिनिधी) नुकत्याच अलिगढ येथे चिमुकलीवर झालेला बलात्कार व हत्त्या या प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड देण्यात यावा. तसेच त्याचबरोबर २०१८ सालात न्यायालयाने बलात्कारप्रकरणात मृत्युदंड दिलेल्या ५८ आरोपींनाही अदयाप शिक्षा झालेली नाही. या सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी येथीलस्व. नरेंद्र अण्णा पाटील संचलित इंदिराई फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १४ वर्षात केवळ एका बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. बलात्कार करणाऱ्यांना वेळीच कठोर शिक्षा दिली जात नसल्याने त्यांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे चित्र आहे. त्यातून बलात्कारासारखे प्रकार दिवसागणिक वाढतच चालले आहेत. त्यांना पायबंद घातला जाणे आवश्यक आहे. हे निवेदन देताना पियुष नरेंद्र पाटील, सूरज नारखेड़े, सरिता माळी, अमय राणे, अजिंक्य पवार, अजिंक्य पाटील, हितेश नारखेडे, सोज्वल पाटील, राहुल शर्मा, शंतनु नारखडे, योगेश निंबाळकर, प्रशांत चौधरी, स्वप्निल चौधरी, राकेश चौधरी, सारंग पवार, निखिल केदार, नयन खड़के, निखिल पोपटानी, दीपेश घाड़े, कुणाल सोनवणे, ललित चौधरी, आदेश देशमुख, आकाश बारी, प्रशांत कोष्टी, जयेश पाटील, गणेश सपके, सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.