फैजपूरची भूमी पवित्र आणि प्रेरणादायी- ब्रिगेडियर दळवी

da42a6b1 2057 4f2f 8f48 19fb57c8c1c8

फैजपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय छात्र सेना देश उभारणीसाठी मोलाची असून कॅम्पच्या माध्यमातून कडेट्स प्रतिकूल परिस्थितीशी यशस्वी संघर्ष करून जीवनात इप्सित साध्य करू शकतात. फैजपूर ही पवित्र भूमी असून स्वातंत्र्य पूर्ण आणि सद्यस्थितीत उभ्या देशासाठी प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्गार
तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजीनाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरादरम्यान अमरावती येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडियर संग्रामसिंग दळवी यांनी काढले.

 

संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांनी ब्रिगेडियर दळवी यांचे आणि कर्नल सत्यशील बाबर यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी स्वागत केले. यानंतर ब्रिगेडियर दळवी यांनी परिसराचा इतिहास जाणून घेतला व परिसराला भेट देता आली याबद्दल आनंद व्यक्त केला. मान्यवरांना एन.सी.सी. कडेट्सतर्फे मानवंदना देण्यात आली.यानंतर ग्रुप कमांडर यांनी कॅम्पला भेट देऊन आर.डी.सी. आणि टी.एस.सी. दिल्ली येथे गेलेल्या कडेट्शी संवाद साधला.

पुढे पी.आय. स्टाफ, ए.एन.ओ. आणि कडेट्स यांच्याशी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. धनाजीनाना महाविद्यालयात फायरिंग रेंज आणि ओबीस्टिकल असल्याबद्दल एन.सी.सी. अधिकारी प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच वार्षिक प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे आयोजित करण्यात मोलाची भूमिका पार पाडल्याबद्दल सन्मान केला. त्यांनी संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सदिच्छा दिल्या.

Protected Content