अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा तापीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
अजय राजेंद्र सैंदाणे (वय २६, रा. धार, ह.मु. सुरत) हा तरूण कपिलेश्वर येथील महाशिवरात्रीनिमित्त असलेल्या यात्रोत्सवासाठी अजय हा सुरतहून येथे आला होता. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास महादेवाचे दर्शन घेण्यापूर्वी तापी नदीवर अंघोळ करण्यासाठी तो गेला. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. यामुळे धार गावावर शोककळा पसरली आहे.