विषारी औषध घेतलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गावात राहणारे ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने विषारी औषध सेवन केले होते. त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना शनिवारी २२ जून रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोपान काळू काळे वय-६२ रा. हरताळे ता. मुक्ताईनगर असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुक्ताईनगर तालुक्यातील सोपान काळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान त्यांनी शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८ वाजता राहत्या घरात पिक फवारणीचे विषारी औषध घेतले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २२ जून रोजी पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. दरम्यान याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक तडवी हे करीत आहे.

Protected Content