पहुर ता. जामनेर प्रतिनिधी । येथे नवीन पाणी टाकीचे काम करत असलेला तरुणाचा तोल गेल्याने तरुण खाली पडताच शरीरात लोखंडी आसारी घुसल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक सपकाळे (वय 55) रा.जळगाव आणि वासुदेव पाटील हे दोघे नवीन पाण्याच्या टाकीचे काम करत असतांना अचानक तोल गेल्याने खाली पडले. अशोक सपकाळे खाली पडताच त्यांच्या शरीरात लोखंडी आसारी घुसल्याने जागीच मृत्यु झाला आहे. तर वासुदेव पाटील यांच्या पायाला आसारी लागल्या ते जखमी झाले असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, प्रदिप लोढा, राजधर पांढरे, रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे व ग्रामस्थांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.