पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पिंपळगाव कमानी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुजा काशिनाथ पवार वय २१ रा. गोंदेगाव तांडा ता.जामनेर असे मयत झालेल्या माहेरवाशीनीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुजा पवार ही विवाहिता आपल्या परिवारासह गोंदगाव तांडा येथे वास्तव्याला आहे. रक्षाबंधनासाठी विवाहिता माहेरी पिंपळगाव कमानी येथे आईवडीलांकडे आलेली होती. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता घरी असतांना विवाहितेच्या हाताला सर्पदंश झाला. त्यांना तातडीने पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. विवाहितेचे तीन वर्षांपुर्वीच लग्न झाले होते. त्याना दोन वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे पिंपळगाव कमानी गावात शोककळा पसरली आहे.