भुसावळात आमरण उपोषण ; लवकरच रस्त्याचे डांबरीकरण

भुसावळ प्रतिनिधी । सिद्धेश्वर नगरात नागरीकांनी रस्ताच्या कामासंदर्भात आमरण उपोषण सुरु केले आहे. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत या कामासंदर्भात चर्चा झाली असून येत्या काही दिवसातच महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगरातून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संबंधित कामासंदर्भात चर्चा केली व सार्वजनिक बांधकाम अभियंता कुरेशी राव साहेब यांना गटनेते राजेंद्र चौधरी यांनी फोन लावता असता त्यांनी सांगीतले की, सदरचा रस्ता स्थानिक आमदार निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेला असुन लवकरच काम सुरू होईल. असे सांगीतल्या नंतर राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी तुम्ही स्वतः येथे येऊन उपोषण करणाऱ्या नागारीकांशी चर्चा करा व त्यांना सांगा असे सांगितले व त्यांच्या विनंतीला मान देऊन कुरेशी रावसाहेब यांनी स्वतः येऊन चर्चा केली व वर्कऑडर दाखवुन काम सुरू करण्यासंदर्भात लेखी दिले व येत्या काही दिवसातच महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

प्रसंगी उपोषणकर्त्यांसह उपस्थित गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक हरी मराठे, सुधाकर बळीराम जावळे, नगरसेवक धनगर, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कैलाश माळी, महेश सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content