पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नियोजित जागेवर बसविण्याच्या मागणीवर १५ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाला बसू.’ या आशयाचे निवेदन इतर राष्ट्रीय इतर मागास वर्ग मोर्चा व बहुजन सहयोगी संघटना यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना दिले आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पाचोरा नगरपालिकेस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नियोजित जागेवर बसविण्यात यावा. या मागणीसाठी वेळोवेळी ठराव देवून या विषयावर चर्चा ही करण्यात आली आहे.
मात्र याविषयी कुठलाही ठोस निर्णय होत नसल्याने बुधवार, दि. १५ जूनपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा; अन्यथा सोमवार, दि. २० जूनपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन इतर राष्ट्रीय इतर मागास वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चा व बहुजन सहयोगी संघटना यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना दि. १ जून रोजी दिले आहे.
यावेळी प्रसंगी राष्ट्रीय इतर मागासवर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, विलास पाटील, मा.नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, अॅड. अविनाश भालेराव, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, मतिन बागवान, दिपक आदिवाल, धनराज पाटील आदींची उपस्थिती होती.