यावल येथे महावितरणाविरोधात होणारे आमरण उपोषण रद्द

यावल प्रतिनिधी । येथे महावितरणच्या शक्तीची विजबिल वसुली धडक मोहीम थांबवी, या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सेवा फाउंडेशनतर्फे आमरण उपोषण करण्यात येणार होते. मात्र, आज महावितरण कंपनीचे विविध अधिकारी व उपोषणकर्ते जलील पटेल यांच्यात जिल्हा परिषदचे गटनेते तथा कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्यात झालेल्या सकारात्मक निर्णयामुळे उपोषण रद्द करण्यात आले आहे.

महावितरणच्या सर्वसामान्य नागरीकांकडुन भोंगळ व शक्तीची वसुली थांबवावी या कारभारा विरोधात आज (दि.२७ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता महावितरणाच्या यावल कार्यालया समोर काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल हे महावितरणच्या मनमानी कारभार व आदी मागण्या मान्य करून घेणे कामी आणि महावितरण कंपनीने कोरोना काळ असून सुद्धा वीजबिल भरणे सक्ती केली होती.

तसेच अनेक शेतकरी, शेतमजूर ,दलित, आदिवासी, आणि इतर सामान्य जनतेला १oo टक्के विजबिल न भरल्यास अन्यथा तुमचे विजकनेक्शन कट करण्याची धडक मोहीमच महावितरण व्दारे सुरू करण्यात आली होती. यामुळे शहरात व परिसरात विज ग्राहक आणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होवुन तक्रारींची पोलीसात नोंद करण्यात आल्या आहेत. पूर्णच रक्कम भरा तसेच आजच भरा असा एक सुत्री वसुलीचा तगादा महावितरणने लावला होता. या गोंधळामुळे अनेक सर्वसामान्य विज ग्राहक मोठ्या संकटात आले होते.

मात्र आज जिल्हा परिषद गटनेते तथा कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याशी बोलणी करून यावल विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी.व्ही. मराठे तसेच यावल महावितरणचे सहाय्यक अभियंता अभियंता ए.बी. दमाले  यांच्या मध्यस्थीने चर्चा करून  विजबिल वसुलीतील संदर्भात सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली आणि मागण्या उपोषणकर्त यांच्या होत्या त्या सकारात्मक मान्य करण्यात आल्याने व सदर चर्चाअंती समाधान झाल्याने सदर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी वढोदे गावचे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल,  कोरपावली गावातील समाजसेवक मुक्तार पिरण पटेल, महेलखेडीच्या सरपंचा शरिफाताई तडवी, काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान, नावरे गावाचे माजी सरपंच समाधान पाटील, हाजी गफ्फार शाह, तालूका अध्यक्ष असंघटिक कामगार काँग्रेस अजय बढे, ईश्वर सोनवणे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content