जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|शहरातील प्रेम नगरात राहणाऱ्या व्यापाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी ४ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली होती. दरम्यान शनिवारी ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
विनोद पूनमचंद जैन (चोरडिया वय-४४, रा. प्रेम नगर, जळगाव) असे मयत व्यापाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रेम नगर परिसरात विनोद जैन हे व्यापारी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये त्यांचे दुकान दुकान असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी ४ जुलै रोजी सकाळी उठल्यावर विनोद यांनी ८.३० वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कुटुंबीयांना समजताच तात्काळ विनोद जैन यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.