विषारी औषध घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा शिवारातील शेतात काहीतरी विषारी औषध घेतल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्या आली आहे.

त्रिविक्रम कृष्णा पाटील वय-५८, रा. साळवा ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील गावात त्रिविक्रम कृष्णा पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी १० मार्च रोजी त्यांच्या गावातील शेतात विषारी औषध घेतले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी गुरूवार १५ मार्च रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनाचा पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहे.

Protected Content