पीक विमा अर्जांची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवावी; प्रकाशभाई पाटील युवा मंचाची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२४ विमा काढण्याची मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत होती परंतु शासनाचे विविध योजनांचे ह्या ऑनलाईन असल्याने गेल्या आठ दिवसापासून सर्व सर्व्हर डाऊन असल्याकारणाने अनेक अशा शेतकऱ्यांचे पिक विमा काढण्याचे राहून गेले आहे. त्या अनुषंगाने अंमळनेर येथील प्रकाशभाई पाटील युवा विकास मंचच्या वतीने धंनजय मुंडे कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना १३ जुलै २०२४ रोजी ईमेलद्वारे ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन पाठवण्यात आले आहे.

तरी आज रोजी जळगाव येथील निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय कासार साहेब यांना प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढून मिळावी यासाठी आज रोजी जळगाव येथे जाऊन प्रकाशभाई युवा विकास मंचाचे अध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील, प्रसिद्धी प्रमुख शामकांत पाटील व प्रकाशभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक गुलाब आगळे यांनी जळगाव येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निवेदन दिले तरी शासनाने याची दखल घ्यावी.

Protected Content