यावल येथे दत्त जयंती उत्साहात

यावल प्रतिनिधी । शहरातील भुसावळ रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित दत्त जयंती सोहळानिमित्त दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दत्त जयंती सोहळा निमित्ताने सुंदर अशी रांगोळी फुलांसह आकर्षक अशा पद्धतीने सजविण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ श्री स्वामी समर्थ बाल संस्कार व  सेवा केंद्र येथे दत्त जयंती निमित्त गेल्या सात दिवसापासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे यात गुरुचरित्र पारायण सोहळा विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच सात दिवस अखंड रात्रंदिवस विना वादन श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आचे वाचन असे अखंड सात दिवस सुरू होते यात दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत यावल तालुक्यातील महिलांनी तर संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत तर पुरुषांनी अखंड नामजप सप्ताहात मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदविला.

प्रत्येक दिवशी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले यात  पहिल्या दिवशी ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी अग्नी प्रदीपण व दुसऱ्या दिवशी मंडळ स्थापना अग्नी स्थापना स्थापित देवता हवन तिसऱ्या दिवशी नित्य सहकार गणेश याग मनोबल या चौथ्या दिवशी नित्य सहकार चंडी याग स्वामी याग रुद्र मल्हार या बली पूर्ण होती व नंतर सत्यदत्त पूजन देवता विसर्जन व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आले

30 डिसेंबर रोजी सकाळी भूपाळी आरती सत्यदत्त पूजन व त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरती अखंड नामजप यज्ञ सप्ताह समारोप झाला याप्रसंगी स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख प्रतिनिधींनी सेंद्रिय शेती सामूहिक सामुद्रिक शास्त्र पर्यावरण प्रकृती विवाह संस्कार व पशुसंवर्धन मुलांवर संस्कार कसे करावे या विविध विषयांवर मार्गदर्शन व आपल्या जीवनात विविध समस्या येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन ह्या विविध विषयावर सात दिवस वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले करण्यात आले कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र यावल केंद्रातील सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.

कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी ने ग्रासलेल्या  महाभयंकर रोगामुळे विविध कार्यक्रम घेताना शासनाने लावून दिलेल्या नियमांचे पालन करुन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी फैजपूर विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलक  यांच्या हस्ते दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी दत्त पूजन तर यावल येथील तहसीलदार महेश पवार सहत्नीक  यांच्या हस्ते 30 डिसेंबर रोजी सकाळी दत्त पूजन करण्यात आले .

 

 

Protected Content