जळगाव प्रतिनिधी । आपल्या अत्युच्च दर्जेदार उत्पादनांमुळे जागतिक पातळीवर लोकप्रियता संपादन करणारी दत्त ड्रीप कंपनी राज्य शासनाच्या सुक्ष्म सिंचन दुरूस्ती पंधरवड्यात सक्रीय सहभागी होणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे ६ ते २० ऑगस्टच्या दरम्यान सुक्ष्म सिंचन सर्व्हीसिंग पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात फैजपूर येथील दत्त ड्रीप कंपनी सक्रीय सहभाग घेणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने कृषी खात्याने काढलेल्या परिपत्रकात ठिबक संच विकणार्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकाला दर्जेदार विक्री-पश्चात सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. दत्त ड्रीप आधीपासूनच याचे पालन करत असून भारतच नव्हे तर जगभरातील आपल्या ग्राहकांना परिपूर्ण आफ्टर सेल सर्व्हीस प्रदान करण्यात येत असल्याचेही कंपनीने आवर्जून नमूद केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ठिबक संच विक्री करणार्या कंपनीने प्रत्येक जिल्ह्यात सर्व्हीस सेंटर उभारावे; पुरवठा केलेल्या संचाला तीन वर्षांपर्यंत विक्री-पश्चात सेवा द्यावी आणि साहित्यात मोडतोड झाल्यास त्याला रिप्लेस करून द्यावे असे सांगण्यात आले आहे. दत्त ड्रीप या सर्व सरकारी निर्देशांचे पालन करून याबाबतची माहिती आपल्या ग्राहकांना देण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.