शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी धैर्यशील माने यांची निवड

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. धैर्यशील माने हे महाराष्ट्रातील हातकणंगले मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले.

शिवसेना पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. नुकताच कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू खासदार म्हणून धैर्यशील माने यांची ओळख आहे. नुकताच धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दांत समाचार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले असून शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

Protected Content