Home Cities अमळनेर अमळनेरात धाडसी घरफोडी; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

अमळनेरात धाडसी घरफोडी; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील गलवाडे रोड ताराचंद नगर येथे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोकडसह दागीने असा एकुण २ लाख ३६ हजार रूपयांची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, कमलेश विजय सोनवणे (वय-२५) रा. गलवाडे रोड, ताराचंद नगर, अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. कामाच्या निमित्ताने ते २५ मे रोजी गावाला गेले. दरम्यान २६ मे रोजीच्या मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून  घरातील लाकडी कपाटातील २ लाख रूपयांची रोकड आणि ३६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राकेशसिंग परदेशी करीत आहे.

 


Protected Content

Play sound