रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधान सभा मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाकडे पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज सादर करून उमेदवारी मागितल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी दिली आहे. सध्या काँग्रेसकडून रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी हे आहे. आता यावर काँग्रेस हायकमांड कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष राहील.
दारा मोहंमद, जफर मोहंमद, इंटकचे भगतसिंग पाटील आणि माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या तिघांनी मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा अर्ज सादर केला. या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी दारामोहंमद म्हणाले की, “रावेर शहरासह मतदार संघाचा आवश्यक तो विकास झाला नाही. बीड जिल्ह्यात जाऊन एका नगरपालिकेला भेट देऊन जास्तीत जास्त निधी कसा आणता येतो याचा अभ्यास केला आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास हमखास निवडून येऊन मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणून विकास करून दाखवू असे सांगितले.
या पत्रकार परिषदेत भगतसिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनीही आपली मते व्यक्त केली. यावेळी आर. के. चौधरी, माजी नगरसेवक आसिफ मोहम्मद, एस. आर. चौधरी, माजी नगरसेवक जगदीश घेटे, बिसन सपकाळ, धुमा तायडे, सावन मेढे, सरपंच नावरे समाधान पाटील, कलिंदर तडवी, निलेश महाजन, आणि कैलास वाणी उपस्थित होते.