धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील हायमास्ट पोल अनेक दिवसापासून पडक्या अवस्थेत आहे. या परिसरात कायमच वर्दळ असल्यामुळे मोठा दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपालिका प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष झालेय.
शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील हाय मास्ट पोल अनेक दिवसापासून वाकलेला आहे. या विद्युत पोलला एका वाहनाने धडक दिल्यापासून तो वाकलेल्या अवस्थेत आहे. बस स्थानक जवळ असल्यामुळे येथून विद्यार्थी, प्रवाशांची कायम वर्दळ असते. एवढेच नव्हे, तर या भागात मोठ्या हातगाड्या देखील लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. दुर्दैवाने हा पोल कोसळला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी देखील नगरपालिका प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत.