जळगाव, प्रतिनिधी | अंजली दमानिया यांनी माझ्यावर बेछूट असे आरोप केले असून त्यासंदर्भात त्यांनी पुरावे द्यावे किंवा अब्रू नुकसानीच्या खटल्यांना सामोरे जावे, या मागणीसाठी माझ्या समर्थक कार्यकर्त्यांनी राज्यभरात २९ ठिकाणी खटले दाखल केले आहेत. पण त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसल्याने दमानिया सुनावणीला कोर्टात हजर न राहता पळ काढत आहेत. असा आरोप आज (दि.१२) माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केला.
ते पुढे म्हणाले की, श्रीमती दमानिया न्यायालयात पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यासाठी त्या वेगवेगळे बहाणे करीत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असे आमचे म्हणणे आहे. जळगावातही अशोक लाडवंजारी यांनी अॅड. व्ही.एच. पाटील यांच्या माध्यमातून खटला दाखल केला आहे. त्याची येत्या २३ जानेवारीला पुढील सुनावणी आहे. असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1484288625057799